नमस्कार, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक (नॅब) या सेवाभावी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.
हल्लीच्या काळात अनेक लोकांना घरातील वृद्ध नकोसे होतात व त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्यात येते. अशा वृद्ध अंधांच्या किती उपेक्षा असतील ? आणि म्हणूनच आम्ही बेळगावढगा ( जिल्हा नाशिक, महाराष्ट्र ) येथे वृद्धाश्रम बनविण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृद्धाश्रम आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असेल. जसे कि प्रार्थनागृह, अतिथी भवन, व्यायामशाळा, मनोरंजनाकरिता वाचनालय, क्रीडा संकुल, इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. वृद्धांसाठी वृद्धाश्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे पण निर्माण आम्ही करणार आहोत. शाळेत व कॉलेजमध्ये जाणारे जे अंध विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह सुद्धा बनणार आहे. हा प्रोजेक्ट १ ते २ वर्षात तयार होईल. सदर प्रोजेक्टची ची एकूण लागत हि जवळजवळ ४ कोटी रुपये असून आपण या सत्कार्यात सहभागी होऊन सढळ हस्ते मदत करावी.
आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता
बांधकामाचे स्वरूप | देणगी |
---|---|
एक रूम | २ लाख ५१ हजार रुपये |
प्रार्थनागृह आणि योगासन रूम | ३ लाख ५१ हजार रुपये |
लायब्ररी | १ लाख ५१ हजार रुपये |
भोजनालय (भोजनालायाचा उपयोग मिटिंग हॉल किंवा काही कार्यक्रमासाठीही करता येईल ) | ५ लाख रुपये ( १०० व्यक्ती बसू शकतील ) |
विहारधाम | ३ लाख ५१ हजार रुपये |
याशिवाय आपण खालीलप्रमाणेही देणगी देऊ शकता
प्लॅटिनम स्तंभ | १ लाख ११ हजार रुपये |
सुवर्ण स्तंभ | ७५ हजार रुपये |
रजत स्तंभ | ५१ हजार रुपये |
आधार स्तंभ | २५ हजार रुपये |
शुभेच्छुक | २५ हजार रुपये च्या आतील |
वर्षभरातील एका तिथी निमित्त | २१ हजार रुपये |
सदर देणग्या देणाऱ्यांची नावे ही ग्रेनाईट तक्त्यांवर दर्शविण्यात येतील
आपल्यापैकी जर कोणी आपल्या आई-वडिलांच्या नावाने डोनेशन देण्यास इच्छुक असेल तर तेही देऊ शकतात. तसेच घरातील मंगलप्रसंगी, किंवा प्रियजनांच्या तिथीनिमित्त किंवा इतर कोणत्याही प्रसंगानिमित्त आपण संस्थेला देणगी देऊन या थोर कार्यात सहभागी होऊन पुण्याचे धनी होऊ शकतात.
आपण देणगी चेक किंवा डीडी या स्वरूपामध्ये देऊ शकता. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
बँकेचे नाव | सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया |
संस्थेचे नाव | नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक |
खाते क्रमांक | 3539245608 |
IFSC क्रमांक | CBIN0282524 |
शाखा | कॅनडा सर्कल, नाशिक, महाराष्ट्र |
MICR क्रमांक | 422016003 |
नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांसाठी मायेची उब, जिच्यात प्रेमाचा ओलावा आहे, नॅब नाशिक म्हणजे आधार देणारा वटवृक्ष जो उन्हात चटक्यांपासून वाचवणार सुखद गारवा आहे. नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांच्या अंधकारमय जीवनाला मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे.