नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक

नमस्कार, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक (नॅब) या सेवाभावी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.

सरकारी अनुदानाशिवाय केवळ आश्रयदाते व हितचिंतक यांच्या सहकार्याने चालणारी हि संस्था आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करताना संस्थेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, मात्र तरीही अडथळ्यांच्या सर्व शर्यती पार करून ही संस्था अंधबांधवांच्या पाठीमागे आधारस्तंभासारखी उभी आहे.

अधिक वाचा

कारकीर्द

आम्ही राबविलेले उपक्रम

अंध विभाग- एकूण नोंदवलेले अंध (नाशिक २०००)
  • विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
  • शैक्षणिक वस्तू वाटप (साहित्य)
  • शिष्यवृत्ती वाटप
  • रायटर

अधिक वाचा

स्वतंत्र अंध विभाग

  • सभागृह
  • अंध क्रिकेट टीम
  • अंध ऑर्केस्ट्रा
  • अंध फिनाईल शिक्षण
  • अंध मसाज शिक्षण
  • ब्रेल लिपी वाचनालय (सहकार्य :- अविनाश मालपाणी )

अधिक वाचा

हॉस्पिटल विभाग कार्य

  • नेत्र तपासणी - १०,००,०००
  • मोफत चष्मे वाटप - ३,००,०००
  • नेत्रदानाचे फॉर्म - ८००
  • नेत्ररोपण शस्त्रक्रिया - १००
  • रोज ओ.पी.डी. सुरु
  • पॅथॉलॉजी डिपार्टमेंट

अधिक वाचा

सर्व उपक्रम बघा

भावी प्रोजेक्ट

हल्लीच्या काळात अनेक लोकांना घरातील वृद्ध नकोसे होतात व त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्यात येते. अशा वृद्ध अंधांच्या किती उपेक्षा असतील ? आणि म्हणूनच आम्ही बेळगावढगा ( जिल्हा नाशिक, महाराष्ट्र ) येथे वृद्धाश्रम बनविण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृद्धाश्रम आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असेल. जसे कि प्रार्थनागृह, अतिथी भवन, व्यायामशाळा, मनोरंजनाकरिता वाचनालय, क्रीडा संकुल, इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. वृद्धांसाठी वृद्धाश्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे पण निर्माण आम्ही करणार आहोत. शाळेत व कॉलेजमध्ये जाणारे जे अंध विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह सुद्धा बनणार आहे. हा प्रोजेक्ट १ ते २ वर्षात तयार होईल. सदर प्रोजेक्टची ची एकूण लागत हि जवळजवळ ४ कोटी रुपये असून आपण या सत्कार्यात सहभागी होऊन सढळ हस्ते मदत करावी.

अधिक वाचा

एक हात मदतीचा

नॅब चे सर्व संचालक, पदाधिकारी अतिशय प्रामाणिकपणे आणि तळमळीने हे कार्य करत आहेत. हल्लीच्या महागाईच्या दिवसात सामान्य माणसालाही जीवन जगन मुश्कील आहे. मग अंधाकडे कोण लक्ष देणार ? परंतु काही दानशूर सहृदयी लोक नॅबला मदत करत असतात आणि त्यांच्यामुळे नॅबला असे विविध उपक्रम राबविणे शक्य होते. आपण नॅबला देत असलेल्या व देणार असलेल्या देणगीचा वापर हा अतिशय प्रामाणिकपणे व निस्पृहतेने अंधांच्या कल्याणाकरताच केला जातो. आपण केले असलेले दान हे निश्चितच सत्पात्री आहे. त्यायोगे आपण अधिकाधिक धनवान आणि पुण्यवान होणार आहात. एक आदर्श नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने आपल्या अंध बांधवाना मदतीचा हात ध्यावा. असे आमचे प्रत्येक जागरूक नागरिकाला आवेदन आहे.

आपण संस्थेस आपल्या मंगल प्रसंगी वा स्मृतिदिनानिमित्त खालीलप्रमाणे देणगी देऊ शकता

  1. पांढरी काठी ५० अंधांना ...........रु. ७,०००/-
  2. शालेय आरोग्य भत्ता वाटप रुपये २०० प्रत्येकी ७५ अंधाना रु. १५,०००/-
  3. अंधांना पुस्तके साहित्य वाटप .........रु. १५,०००/-

धन्यवाद.


मदतीसाठी येथे संपर्क करा : ०२५३ - २५८०१४० / २३१३५६१ / +९१ ९८९००६५६६७

नॅब हॉस्पिटल

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक संचालित श्रीमती कांताबेन र. शहा नेत्र हॉस्पिटल

मोतीबिंदू ऑपरेशन फक्त ८०००/-

पत्ता: लिबर्टी पॉईंट, राका कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक

हॉस्पिटल सर्वांसाठी खुले

संचालक मंडळ

श्री. प्रकाश सुराणा

श्री. प्रकाश सुराणा

आय.पी.पी.

श्रीमती निर्मालाबेन शाह

श्रीमती निर्मालाबेन शाह

अध्यक्ष

श्री. शितलभाऊ सुराणा

श्री. शितलभाऊ सुराणा

जनरल सेक्रेटरी

श्री. शशिकांत पारख

श्री. श्री. शशिकांत पारख

कार्याध्यक्ष

सर्व सदस्य पहा

दृष्टीबाधितांसाठी नॅब नाशिकचे योगदान

नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांसाठी मायेची उब, जिच्यात प्रेमाचा ओलावा आहे, नॅब नाशिक म्हणजे आधार देणारा वटवृक्ष जो उन्हात चटक्यांपासून वाचवणार सुखद गारवा आहे. नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांच्या अंधकारमय जीवनाला मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे.

संपर्क

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक
लिबर्टी पॉईंट, राका गार्डन जवळ, राका कॉलनी,
नाशिक, महाराष्ट्र - 422002
संपर्क
फोन: ०२५३ - २५८०१४० / २३१३५६१
मोबाईल: +९१ ९८९००६५६६७
+९१ ९९२२३५०७३३
ई-मेल
sheetalsurana123@gmail.com
nirmalashahshah@yahoo.in

मॅप