नमस्कार, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक (नॅब) या सेवाभावी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.
सरकारी अनुदानाशिवाय केवळ आश्रयदाते व हितचिंतक यांच्या सहकार्याने चालणारी हि संस्था आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करताना संस्थेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, मात्र तरीही अडथळ्यांच्या सर्व शर्यती पार करून ही संस्था अंधबांधवांच्या पाठीमागे आधारस्तंभासारखी उभी आहे.
बेरोजगार अंधांना आरोग्यभत्ता वाटप: जो कोणी अंध बेरोजगार असेल, त्यास काही कामधंदा व नोकरी नसेल अशा १५ ते ४० वयोगटाच्या अंधांना त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी कोणाकडे हात पसरावा लागू नये त्यासाठी त्यांना दरमहा रू. २०० आरोग्यभत्ता संस्थेमार्फत देण्यात येतो.
या योजने अंतर्गत नॅब नाशिक शाखेतर्फे प्रत्येक अंधांच्या नावाने रु. २००/- बँकेत जमा करून त्यांचा अपघाती विमा उतरविला आहे. त्यात जर एखादा अंध अपघातात निधन पावला तर त्यांच्या वारसाला २ लाख रु. मिळतील, असे विम्याचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे हि योजना १० वर्षांपर्यंत लागू असेल. यात पंजाब नॅशनल बँकेचे संस्थेला मार्गदर्शन लाभले. त्यासाठी त्यांचे धन्यवाद !
नेहमीप्रमाणे अंधांना आर्थिक, शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदत, रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम चालू आहेत. हे सर्व आपण आमच्या पाठीशी आह्त्यात म्हणून शक्य झाले आहे. कित्येक अंधांना टपरी म्हणजे मुव्हेबल शॉप देण्यात आलेले आहे. अंध त्यावर कटलरी सामान, पाववडा, चहा-कॉफी, भाजीपाला इ. वस्तूंची विक्री आकारून रोजगार उपलब्ध करतात. श्रीमती कांताबेन रसिकलाल शाह यांच्या मोलाच्या आर्थिक सहाय्यामुळे आम्हाला व नेत्र हॉस्पिटल व नेत्र तपासणीची कार्य उस्फुर्तपणे करता येते.
गावकरी, देशदूत, लोकमत, भ्रमर, सकाळ, दिव्यमराठी, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी, पुढारी या सर्व दैनिक वृत्तपत्रांनी प्रसिद्धीसाठी मोलाची मदत केलेली आहे.
अनेक व्यापारी संस्था कार्यालये, दुकाने, यांच्यामध्ये डोनेशन बॉक्सेस ठेवणे. आमच्या संस्थेत आर्थिक सहाय्य करीत आहेत.
मा. श्री रसिकलालजी धाडीवाल ( उद्योगपती ), मा. श्री. राजुभाई शहा आणि मा. श्री. विलासभाई शहा (उद्योगपति- विराज इस्टेट) मा. श्री. ज्ञानेश्वरजी जवजाळ ( जिल्हा पुरवठा अधिकारी ), मा. श्री. संजयजी सोनी ( सोनी पैठणी ), श्रीमती कौमुदिनी संजेरा ( मुख्याध्यापक व्हारोइझन स्कूल ), मा. श्री. अॅड यतीनजी वाघ ( माजी महापौर ), मा. श्री. संजीवजी ठाकूर ( सहाय्यक पोलीस आयुक्त ), मा. श्री. महेशजी शाह (सुप्रसिद्ध बिल्डर्स), मा. श्री. विजयकुमारजी बेदमुथा ( संचालक नवकार बिल्डर्स ), मा. श्री. प्रवीणजी सिसोदिया ( समाज कार्यकर्ता ), मा. सौ. विजयश्री चुंबळे ( अध्यक्ष, जिल्हापरिषद ), मा. श्री. किशोरजी खाबिया ( खाबिया ग्रुप ), मा. श्री. संजयजी अंपराती ( माजी आय.पी.एस. ), मा. श्री अशोकजी संघवी ( प्रसिद्ध चार्टड अकाऊंटंट ), सौ. अश्विनी तुळजापूरकर, उद्योजिका मुंबई, श्री दिपकजी बागड, बिल्डर, मा. श्री शामशेठ तांबोळी, उद्योजक तसेच पीएमसी बँक, नाशिक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, मा. श्री विजयजी बोरा ( प्रतिथयश उद्योजक ) यांनी नॅब नाशिकला वेळोवेळी अंध बांधवांसाठी दिलेल्या टपरीबद्दल त्याचे शतशः आभार. सर्वांच्या सहकार्याने आम्हाला आमच्या कार्यास स्फूर्ती व उर्जा मिळाली आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालये, जिल्हा परिषद, सर्व पोलीस स्टेशन, शाळा, बँका या सर्वांच्या बहुमूल्य योगदानामुळे संथेची प्रगती होत आहे. संस्थेचे नॅब संचालित श्रीमती कांताबेन रसिकलाल शाह गुरुकुल प्रकल्प राबविण्याचे स्वप्न आहे व ते लवकरच अस्तित्वात येईल अशी आशा आहे. त्यासाठी आम्ही एक एकर जागा घेणार आहे. तेथे वृद्ध अंधांची राहण्याची सोय करणार आहोत. हल्लीच्या काळात अनेक लोकांना घरातील वृद्ध नकोसे होतात व त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्यात येते. अशा वृद्ध अंधांच्या किती उपेक्षा असतील ? आणि म्हणूनच आम्ही बेळगावढगा येथे वृद्धाश्रम बनविण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृद्धाश्रम आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असेल. जसे कि प्रार्थनागृह, अतिथी भवन, व्यायामशाळा, मनोरंजनाकरिता वाचनालय, क्रीडा संकुल, इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. वृद्धांसाठी वृद्धाश्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे पण निर्माण करणार आहोत. शाळेत व कॉलेजमध्ये जाणारे जे अंध व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी वसतिगृह बनणार आहे. हा प्रोजेक्ट १ ते २ वर्षात तयार होईल. हि आहे आमची भविष्याची वाटचाल. त्यासाठी संस्थेचे माननीय. श्री. विलासजी शाह व सौ. शिल्पा शाह यांचे उच्चतम योगदान आहे.
नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांसाठी मायेची उब, जिच्यात प्रेमाचा ओलावा आहे, नॅब नाशिक म्हणजे आधार देणारा वटवृक्ष जो उन्हात चटक्यांपासून वाचवणार सुखद गारवा आहे. नॅब नाशिक म्हणजे अंध बांधवांच्या अंधकारमय जीवनाला मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे.